मळगावात ‘भिल्लवाडी’तर्फे १९ ला शिवजयंतीचा उत्सव
मळगावात ‘भिल्लवाडी’तर्फे
१९ ला शिवजयंती उत्सव
सावंतवाडी, ता. १३ : मळगाव (ता. सावंतवाडी) येथे भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने १९ ला सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पहाटे साडेपाचला यशवंतगड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी मशाल रॅली काढून कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी साडेनऊला ढोल-ताशांच्या गजरात मशालींचे स्वागत आणि शिवरायांचा अभिषेक सोहळा होईल. सायंकाळच्या सत्रात साडेपाचपासून लेझीम नृत्य, वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच साडेसातला स्नेहभोजन, हळदी-कुंकू आणि बादल चौधरी यांच्या सहभागाने ‘खेळ पैठणी’चा हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना चांदीचे नाणे, कुकर, इलेक्ट्रिक केटल आणि ट्रॅव्हलिंग बॅग अशी आकर्षक बक्षिसे आहेत. रात्री साडेनऊला दशावतार नाटकाने या उत्सवाची सांगता होईल. हा सर्व सोहळा मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार असून, सर्व शिवप्रेमींनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

