-काळकाईकोंड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य

-काळकाईकोंड परिसरात कचऱ्याचं साम्राज्य

Published on

rat१४p३.jpg ः
२६O२४४८७
दापोली - काळकाईकोंड परिसरात उघड्यावर टाकण्यात आलेला प्लास्टिक कचरा उनाड गुरे खात असताना.
-----------
काळकाईकोंड परिसरात कचऱ्याचे ढीग
गुरांच्या जीवितास धोका ; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १४ :- शहरातील काळकाईकोंड परिसरात उघड्यावर टाकण्यात आलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण व जनावरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. दापोली-खेड महामार्गावर करमरकर शोरूमशेजारील हिलटॉप भागातील भंगार डेपोच्याकडेला मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा साचल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या, पॅकेजिंग साहित्य व इतर अविघटनशील कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत आहेत. या ठिकाणी अन्नाच्या शोधात येणारी गुरे हा प्लास्टिक कचरा खात असल्याचे नागरिकांनी पाहिले असून, त्यामुळे जनावरांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिक पोटात साचल्यास जनावरांना पचनासंबंधी गंभीर आजार होण्याची शक्यता असते; काही वेळा त्यातून मृत्यूही ओढवू शकतो.
दरम्यान, महामार्गालगत गुरांची वाढती संख्याही अपघातांना आमंत्रण देणारी ठरत आहे. अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालकांसमोर धोका निर्माण होत असून, सार्वजनिक सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
---
चौकट...
संबंधितांवर कारवाई करावी
काळकाईकोंड परिसरात उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यात गुरे अन्न शोधताना दिसतात आणि नकळत प्लास्टिक खातात. यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीमुळे परिसरात राहणंही कठीण झालं आहे. ही बाब अनेकदा लक्षात आणून देऊनही संबंधितांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. दापोली नगरपंचायतीने तातडीने या ठिकाणी स्वच्छतामोहीम राबवावी, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि भविष्यात असा प्रकार होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक अल्ताफ मुकादम यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com