-हजारामध्ये महिना कसा काढायचा, किमान १० हजार पेन्शन द्या
rat१४p१.jpg-
P२६O२४४७५
रत्नागिरी- ईपीएस अंतर्गत पेन्शन धारकांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
-----
किमान १० हजार पेन्शन द्या...
ईपीएस पेन्शनधारकांचा मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : ईपीएस १९९५ अंतर्गत पेन्शन धारकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काल रत्नागिरी येथे मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
देशातील सुमारे ७२ ते ८१ लाख पेन्शनधारक आणि त्यांच्या पत्नी अत्यंत कमी रकमेवर उदरनिर्वाह करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेकांना दरमहा १ हजार ते २,५०० रुपयांपर्यंतच पेन्शन मिळत असून वाढती महागाई, औषधोपचाराचा खर्च, घरभाडे, वीजबिल आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. किमान १० हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी, नियमित महागाई भत्ता लागू करावा, तसेच पेन्शनधारकाच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला ५० टक्क्यांऐवजी १०० टक्के पेन्शन मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय सर्व पेन्शनधारक व त्यांच्या पत्नींना शासनाच्या आरोग्य योजनेत समाविष्ट करून मोफत वैद्यकीय सुविधा द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली. मोर्चादरम्यान घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून मागण्या शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. मोर्चा शांततेत पार पडला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

