श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भूतदयेचे दर्शन

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भूतदयेचे दर्शन

Published on

rat१४p४.jpg -
२६O२४४८९
लांजा - जखमी झालेल्या भटक्या, मुक्या जनावरांवर स्वखर्चाने उपचार करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजा या संघटनेचे पदाधिकारी.
-----
जखमी मुक्यां जनावरांसाठी धडपडणारी माणसे
लांज्यातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पुढाकार ; स्वखर्चाने उपचार करून जीवदान

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १४ -: आजकाल माणुसकी हरपल्याची उदाहरणे आपल्याला जागोजागी दिसून येतात; मात्र याला छेद दिला आहे तो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजा या संस्थाधारकऱ्यांनी.‌ दोन वर्षात जखमी झालेल्या ४० ते ४५ मुक्या जनावरांवर उपचार करून खऱ्या अर्थाने भूतदयेचे दर्शन घडवले आहे.‌ त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
लांजा शहरात रस्त्यालगत किंवा अन्य ठिकाणी एखादे जनावर जखमी किंवा आजारी अवस्थेत आढळून आल्यास श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान लांजा या संस्थेचे पदाधिकारी (धारकरी) त्या ठिकाणी या मुक्या जनावरांच्या मदतीसाठी धावून जातात. त्यांच्यावर स्वखर्चाने उपचार करतात. लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाला अनेकदा वाहनांची धडक बसून काही गुरे जखमीदेखील होतात. अशावेळी या गुरांना दवाखान्यात नेऊन किंवा अपघात झालेल्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यावर उपचार केले जातात. या ठिकाणी उपचार होत नसेल तर त्यांना स्वखर्चाने रत्नागिरीतील गोशाळेत पाठवून त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जातात.
आजवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान लांजाच्या या धारकऱ्यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात ४० ते ४५ अशा मुक्या आणि भटक्या गुरांवर उपचार करण्यात आले आहेत. हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे मानून अशा प्रकारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी गेल्या दोन वर्षांपासून हे काम निःस्वार्थी भावनेने करत आहेत. मुक्या जनावरांवर स्वखर्चाने उपचार करून त्यांना बरे करण्याच्या त्यांच्या या भूतदयेचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com