भोसले टेक्नॉलॉजीमध्ये ''पोस्को'' कायद्याचे धडे
24495
‘भोसले टेक्नॉलॉजी’मध्ये
‘पोक्सो’ कायद्याचे धडे
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गतर्फे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) या विषयावर जनजागृती कार्यक्रम बुधवारी (ता. ११) येथील यशवंत भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे झाला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाला सहायक लोक अभिरक्षक ॲड. ऋचा लोखंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमन बने, उपप्राचार्य गजानन भोसले, श्री. पाटील, प्राजक्ता राणे आदी उपस्थित होते. पोक्सो कायद्याची मूलभूत माहिती, संमतीचे वय, कायद्यातील गुन्ह्यांचे प्रकार तसेच उल्लंघन झाल्यास होणारे दंडात्मक परिणाम याबाबत ॲड. लोखंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सुमारे ६०० विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये डिप्लोमा, सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. योग्य व अयोग्य स्पर्श, सोशल मीडियावरील जबाबदारी तसेच अल्पवयीन मुलांशी संबंधित कायदेशीर बाबी याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘अज्ञानामुळे चूक होऊ नये’ या उद्देशाने कायद्याची माहिती सोप्या भाषेत स्पष्ट केली. प्रो. प्राजक्ता राणे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

