दैवज्ञ समाजाने एकजूट अखंड जपावी
24496
दैवज्ञ समाजाने एकजूट अखंड जपावी
डॉ. रायकर ः बांद्यात नरहरी सोनार, नाना शंकरशेट यांना वंदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः बांदा दैवज्ञ समाजातर्फे दरवर्षी संत शिरोमणी नरहरी सोनार आणि समाज श्रेष्ठी नाना शंकरशेट यांच्या कार्याचे आवर्जुन स्मरण केले जाते, हे कौतुकास्पद आहे. नाना शंकरशेट यांनी समाजासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्याची समाज तसेच शासकीय स्तरावर व्यापक दखल घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी दैवज्ञ भवन तथा दैवज्ञ पतपेढी झाली पाहिजे. बांद्यातील दैवज्ञ समाजाची एकजूट आणि कार्य स्तुत्य आहे, असे प्रतिपादन दैवज्ञ समाजोन्नती परिषद मुंबई विश्वस्त तथा मालवण दैवज्ञ हितवर्धक समाज अध्यक्ष डॉ. विवेक रायकर यांनी येथे केले.
बांदा दैवज्ञ ब्राह्मण समाज बांधव आयोजित संत नरहरी सोनार पुण्यतिथी आणि समाजश्रेष्ठी नाना शंकरशेट स्मृती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. बांदा विविध कार्यकारी सोसायटीच्या अळवणी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांदा दैवज्ञ समाज अध्यक्ष संतोष चिंदरकर होते. यावेळी व्यासपीठावर मालवण दैवज्ञ समाज सचिव गणेश प्रभुलकर, श्रीकृष्ण शिरोडकर, बांदा उपसरपंच आबा धारगळकर, ज्येष्ठ सुवर्णकार रवींद्र मालवणकर, सोनुनाथ उर्फ अण्णा धारगळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. विवेक रायकर, गणेश प्रभुलकर, राजाराम धारगळकर, श्रीकृष्ण शिरोडकर, प्रीतम पणदूरकर, एकता मालवणकर, गुरुप्रसाद धारगळकर, चिन्मय चिंदरकर, हर्ष चिंदरकर, श्रावणी धारगळकर, मंगलदास साळगावकर, तन्वी धारगळकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात दैवज्ञ समाजातील विविध मान्यवरांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात चिंदरकर यांनी आपल्या सर्व सुवर्णकार समाज बांधवांना सोबत घेऊन समाज विकासासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. दीपप्रज्वलन तसेच संत नरहरी सोनार व नाना शंकरशेट यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या सोहळ्याला उपाध्यक्ष प्रशांत चिंदरकर, सेचिव प्रसाद चिंदरकर, आपा चिंदरकर, साईनाथ धारगळकर,ओंकार मालवणकर, साईप्रसाद मालवणकर, सुरेश चिंदरकर, उमेश चिंदरकर, किशोर साळगावकर, साईराज साळगावकर, अभी धारगळकर, दादा धारगळकर, प्रथमेश मालवणकर उपस्थित होते. हनुमंत मालवणकर यांनी सूत्रसंचालन केले. अण्णा धारगळकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

