वैभववाडी येथे मंगळवारपासून
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषद

वैभववाडी येथे मंगळवारपासून आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषद

Published on

वैभववाडी येथे मंगळवारपासून
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषद

जागभरातील शास्त्रज्ञ, संशोधक उपस्थित राहणार

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १४ ः येथील आंनदीबाई रावराणे महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन १७ आणि १८ फेब्रुवारीला केले आहे. या परिषदेला जगभरातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ, संशोधक उपस्थित राहणार आहेत. जगभरात रसायनशास्त्रात होणारे बदल या परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रसायनशास्त्र विभागात संशोधन आणि अभ्यास करणाऱ्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांना जाणून घेण्याची मोठी संधी या परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे. आतापर्यंत देश, परदेशातील दोनशेहून अधिकांनी नोंदणी केली आहे.
रावराणे महाविद्यालयात पीएम उच्चस्तर अभियान राबविले जात आहे. याअंतर्गत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने फ्रन्टायरर्स इन केमिकल सायन्स (रासायनिक विज्ञानातील सीमारेषा) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १७ व १८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मेजर कौस्तुभ रावराणे सभागृहात होणार आहे. या परिषदेचे उद्‌घान मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेचे पॉलिमर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिव्हिजन, सी.एस.आय.आर. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. प्रकाश वडगावकर यांच्या बीजभाषणाने होणार आहे. याशिवाय इटली येथील डॉ. जियानवितो विलें, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉ. एस. एस. राशीनकर, नायजेरियाचे डॉ. अदेबायो आयझॅक ओलोशो, सोलापूर विद्यापीठाचे डॉ. एस. आर. पुजारी, इटली येथील डॉ. व्ही. बी. सप्ताळ, साऊथ कोरियाचे डॉ. सी. एस. गुंड, मुंबईच्या डॉ. अर्चना काळेकर उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाविद्यालयाच्या माध्यमातून या परिषदेची तयारी सुरू झाली असल्याची माहिती संस्थेचे संचालक शरदचंद्र रावराणे, प्रा. एन. व्ही. गवळी, प्रा. डॉ. डी. एम. पाखरे, प्रा. डॉ. के. एस. पाखरे, एस. एम. करपे, डॉ. व्ही. बी. गोपुला, अधीक्षक संजय रावराणे यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com