खारेपाटण रोटरीचे कार्य कौतुकास्पद
24518
खारेपाटण ः रोटरी क्लबच्या वतीने महिलांना शिलाई मशिनचे वाटप करताना अरुण भंडारे, सचिन मदने, प्रणय तेली, दयानंद कोकाटे, प्रवीण लोकरे व इतर.
खारेपाटण रोटरीचे कार्य कौतुकास्पद
अरुण भंडारे ः मेळाव्यात महिलांना शिलाई मशीन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : खारेपाटणसारख्या ग्रामीण भागात रोटरी क्लबने गेल्या वर्षभरात राबविलेले सामाजिक उपक्रम निश्चितच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन अरुण भंडारे यांनी खारेपाटण येथे रोटरी मेळाव्याप्रसंगी केले.
रोटरी विश्वातील महत्त्वाची समजली जाणारी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिट नुकतीच खारेपाटण रोटरी क्लब येथे झाली. यावेळी श्री. भंडारे यांच्यासह असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण रोटरीचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, सचिव अजय गुरसाळे, खजिनदार सारिका मेहेंद्रे आणि संपूर्ण टीमने उल्लेखनीय काम केल्याबद्दल भंडारे यांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमारकरिता रेकॉर्ड तयार करण्यासाठी वैभववाडी रोटरी क्लबचे विशेष अभिनंदन आणि जीएसआर संजय रावराणे, माजी अध्यक्ष प्रशांत गुळेकर, अध्यक्ष सचिन रावराणे व टीमही कौतुक केले.
यावेळी महिला सबलीकरणाच्या दृष्टीने खारेपाटण पंचक्रोशीतील पाच गरजू महिलांना भंडारे यांच्या उपस्थितीत शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व रोटरी सदस्यांचेही अभिनंद करण्यात आले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व रोटरी सदस्य प्रवीण लोकरे, संचालक विजय देसाई, महेश कोळसुलकर, भाऊ राणे, संकेत लोकरे, सुबोध देसाई, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य ए. डी. कांबळे, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक व रोटरीयन संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, यशवंत रायबागकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

