''घरडा''तील परिषदेत विद्यार्थ्यांचा उद्योगांशी संवाद
उद्योग अन् शिक्षण एकाच व्यासपीठावर
घरडा इन्स्टिट्यूटमध्ये ‘एचआर कॉन्क्ले’ परिषद
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १४ : तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे भविष्यासाठी सज्ज अभियंते घडवण्यासाठी आयोजित ‘एचआर कॉन्क्लेव’ परिषद उद्योग व शिक्षणसंस्थांमधील महत्त्वाचा दुवा ठरली. उद्योगजगत व शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आयोजित या परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर ताठरे यांनी एचआर कॉन्क्लेवच्या संकल्पना, उद्दिष्टे व अपेक्षित परिणामांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज बनवण्यासाठी कौशल्याधारित व परिणामाभिमुख उपक्रम राबवण्याची आवश्यकता अधोरेखित केली तसेच संस्थेची शैक्षणिक प्रगती, गुणवत्तापूर्ण अध्यापन, प्लेसमेंट्समधील सकारात्मक वाटचाल, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुरूप उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आदी विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. ए. बी. मराठे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उद्योग-शिक्षणसंस्था समन्वय यातील सुसंगतीवर भर देत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील कौशल्यविकास व उद्योगप्रणित अभ्यासक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीने विद्यार्थी उद्योगाच्या गरजांशी सुसंगत ठरतील, असे स्पष्ट केले. खुल्या चर्चासत्रामध्ये संस्थेच्या ८ विभागांच्या विभागप्रमुखांनी विभागांची वैशिष्ट्ये मांडत उद्योगांशी सहकार्याबाबत आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

