हँड्स-ऑन अपर लिंब कॅडॅव्हेरिक कार्यशाळा उत्साहात

हँड्स-ऑन अपर लिंब कॅडॅव्हेरिक कार्यशाळा उत्साहात

Published on

अपर लिंब शस्त्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
चिपळूण, ता. १४ : सावर्डे येथील वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच ‘हँड्स ऑन अपर लिंब कॅडॅव्हेरिक वर्कशॉप’ यशस्वीरीत्या झाले. ऑर्थोपेडिक्स, अ‍ॅनाटॉमी व रेडिओलॉजी विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोनदिवसीय कार्यशाळेचा उद्देश सॉफ्ट एम्बाल्म्ड कॅडॅव्हरच्या साहाय्याने अपर लिंब शस्त्रक्रियात्मक पद्धतींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे हा होता.
या वेळी डॉ. सुनील नाडकर्णी, डॉ. मानसिंग घाटगे, डॉ. नेताजी पाटील, डॉ. नंदन कानविंदे आदी उद्‍घाटनाला उपस्थित होते. हात, मनगट, फोरआर्म, कोपर, आर्म व शोल्डर या भागांवरील विविध शस्त्रक्रियात्मक अ‍ॅप्रोचेसचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे अ‍ॅनाटॉमी विभागाचा नावीन्यपूर्ण सहभाग. डॉ. प्रशांत मुल्या, डॉ. पुष्पा बुरुटे, डॉ. संतोषकुमार भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र अ‍ॅनाटॉमी स्टेशन्स उभारण्यात आले, जिथे प्रशिक्षित प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांनी चार्ट्स व टॅब्लेटवरील थ्रीडी अ‍ॅनाटॉमी मॉडेल्सच्या साहाय्याने अपर लिंब अ‍ॅनाटॉमीचे सादरीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com