

अनोळखी वाहनाच्या
धडकेत तरुणी ठार
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील तुळशी फाटा येथे शुक्रवारी (ता. १३) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अनोळखी वाहनाच्या धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाहनाचे चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुरुवातीला तरुणीची ओळख पटत नव्हती. स्थानिकांच्या मदतीने व नातेवाइकांशी संपर्क साधल्यानंतर मृत तरुणीचे नाव स्वप्नाली विजय कदम (रा. वावे वाळंजवाडी) असे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवला असून वाहनाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून संबंधित वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.