आरोग्य ही वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक जबाबदारी
आरोग्य जपणे ही सामाजिक जबाबदारी
डॉ. अविनाश शावोजी ः सावर्डे येथे कर्करोगावर प्रबोधन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १४ ः आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्य जपणे ही केवळ वैयक्तिक गरज नसून समाजाप्रति असलेली महत्त्वाची जबाबदारी आहे, असा संदेश सावर्डे येथे आयोजित कर्करोग प्रबोधन कार्यशाळेत देण्यात आला.
सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयात एकदिवसीय कर्करोग प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रयास अमरावती येथील डॉ. अविनाश शावोजी यांनी मार्गदर्शन केले. निरोगी व्यक्तीच कुटुंब व समाजाला सक्षम साथ देऊ शकते, असे त्यांनी सांगितले. वाढता ताण, असंतुलित जीवनशैली यामुळे कॅन्सर, मधुमेह व रक्तदाबासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याने नियमित व्यायाम, संतुलित आहार व वैद्यकीय तपासणीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
दुसऱ्या सत्रात आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअरसेंटर, अहिल्यानगरचे प्रदीप काकडे यांनी मानसिक सक्षमीकरणावर भर दिला. कॅन्सर योद्ध्यांच्या अनुभव कथनातून उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रेरणा व आत्मविश्वास मिळाला. या वेळी ‘आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअरसेंटर’चे प्रदीप काकडे, कॅन्सर योद्धे चंदाताई, बाळ काळणे व युनुस आसाराम भवर उपस्थित होते.
या प्रसंगी पुष्पा पाटील म्हणाल्या, मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचाराच्या जोरावर माणसाला कर्करोगासारख्या कितीही मोठ्या आजारावर मात करणे शक्य आहे. निराश होऊ नका, लढा. कर्करोग हा शेवट नसून नव्या संघर्षाची सुरुवात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

