खारेपाटण केंद्रशाळा तालुक्यात अव्वल
24543
खारेपाटण केंद्रशाळा तालुक्यात अव्वल
‘मुख्यमंत्री माझी शाळा’ अभियान; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३’ या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेली खारेपाटण जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. १ शाळेने कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ही शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. शाळेच्या या देदीप्यमान यशाबद्दल मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, त्यांचे सहकारी शिक्षक व शाळेचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण केंद्रशाळा क्र.१ ने सलग तीन वर्षे ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात सहभाग घेत सादरीकरण केले आहे. नुकतीच या शाळेला जिल्हास्तरीय परीक्षण समितीने भेट देऊन पाहणी केली. शाळेचे अभिलेख दप्तर तपासणी, शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा, अभ्यासक्रम तसेच सहशालेय उपक्रमांची तपासणी यावेळी करण्यात आली.
खारेपाटण केंद्रशाळेने अद्यावत ठेवलेले शालेय रेकॉर्ड, शाळेचा स्वच्छ, सुंदर परिसर, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश यामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली आहे. या यशात शाळा समितीचा मोठा वाटा आहे. शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नुकताच या शाळेचा जिल्हा परिषद सदस्य प्राची इसवलकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी भेट देऊन शाळेचे अभिनंदन केले. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण हायस्कूलतर्फे मुख्याध्यापक श्रावणकर यांचा संस्थाध्यक्ष प्रवीण लोकरे, प्रा. संजय सानप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रशाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, गौरी शिंदे, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे, संध्या पोरे व पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक श्रावणकर व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

