लांजा येथे २१ रोजी ढोल-ताशा वादन स्पर्धा
लांजा येथे २१ रोजी
ढोल-ताशा वादन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १५ ः लांजा शहरातील नुतन युवक मंडळ शेट्येवाडी यांच्यातर्फे ढोल-ताशा वादन स्पर्धा २१ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री पौलस्तेश्वर जुगाई देवी मंदिरात होणार आहे.
ढोल-ताशा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पथकाला रोख १० हजार ५५५ रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ५५५ रुपये व सन्मानचिन्ह आहे. आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट ढोलवादक, सर्वोत्कृष्ट झांजवादक, सर्वोत्कृष्ट ताशावादक आणि सर्वोत्कृष्ट निशाणधारक असे विविध सन्मानचिन्ह देऊन उत्कृष्ट कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.
तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व पथकांनाही सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील सहभागी पथकांना आयोजकांच्यावतीने १ हजार रुपये गाडी खर्च देण्यात येणार असून तालुक्याबाहेरील पथकांना १ हजार ५०० रुपये गाडी खर्च दिला जाणार आहे. त्यामुळे तालुक्यासह परिसरातील अधिकाधिक ढोल-ताशा पथकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी श्रीनिवास शेट्ये, राहुल शेट्ये, अनिकेत शेट्ये, गणेश शेट्ये व अक्षय शेट्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

