कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात

कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात
Published on

rat15p7.jpg
24642
राजापूरः पानावर साचलेला चिकटा आणि काळा पडलेला मोहोर.

कोकणातील आंबा बागायतदार आर्थिक संकटात
मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन ; मंगलमूर्ती उत्पादक संघाच्या विविध मागण्या
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा आणि प्रतिकूल वातावरणाचा मोठा फटका कोकणच्या हापूस आंब्याला बसला आहे. वारंवार होणारी औषध फवारणी करूनही मोहोर गळल्याने आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघ, आडीवरे-कशेळी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
आंबा हंगामाच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पाऊस आणि दाट धुके यांमुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. मोहोर टिकवण्यासाठी आणि फळधारणेसाठी शेतकऱ्यांनी ५ ते ७ वेळा महागड्या फवारणी केली. मात्र, तुडतुडा आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्याने बहुतांश मोहोर काळा पडून गळून गेला आहे. हजारो रुपये खर्च करूनही उत्पन्न हाती न आल्याने शेतकरी कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे नुकतेच रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आडीवरे येथे मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. यावर्षी शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले असून, शासनाने याचा सकारात्मक विचार करावा आणि बागायतदारांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, असे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या वेळी मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र कारेकर, सेक्रेटरी रवींद्र सकपाळ, खजिनदार प्रकाश डुकळे, ॲड. समीर कुंटे, भूषण सकपाळ, राजेश पारकर, अनिल पाध्ये, सुनील रूमडे यांसह तालुक्यातील अनेक प्रगतशील बागायतदार आणि शेतकरी उपस्थित होते.

चौकट
नुकसानीची भीषणता
बागायतदारांच्या मते, फवारणी आणि मजुरीवर केलेला खर्चही यंदा वसूल होणे कठीण झाले आहे. निसर्गाच्या कोपामुळे हापूसच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, आता केवळ सरकारी मदतीकडेच शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com