त्रिंबक शाळेत २१ मार्चला जिल्हास्तर वक्तृत्व स्पर्धा
त्रिंबक शाळेत २१ मार्चला
जिल्हास्तर वक्तृत्व स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १५ ः वाचन कलाविकास समिती, त्रिंबक संचलित गाडगीळ गुरुजी वाचनालय त्रिंबक यांच्या वतीने दादा ठाकूर (आचरा-पारवाडी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २१ मार्चला सकाळी ९.३० वाजता जनता विद्यामंदिर, त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.
स्पर्धेचे विषय असे ः ‘व्यक्तिमत्त्व विकासात ग्रंथालयांचे स्थान’, ‘मोबाईल! आदर्श समाजजीवनाचे वरदान की शाप?’, ‘ग्रामीण भागातील युवांच्या विवाहसमस्या आणि उपाययोजना.’ स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर किमान ६ व कमाल ८ मिनिटे बोलायचे आहे. १ जानेवारी २०२६ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला जिल्ह्यातील कोणताही स्पर्धक सहभागी होऊ शकतो. विजेत्यांना प्रथम २० हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय १५०० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय १ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ ५०० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम प्रवेश पत्रिका आलेल्या १५ स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल. स्पर्धकांनी आपली नावे सहाय्यक ग्रंथपाल विवेक जाधव यांच्याकडे १४ मार्चपर्यंत द्यावीत. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. प्रवेश अर्ज व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठविण्यात येईल. अधिक माहितीसाठी अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे सचिव प्रशांत मेहेंदळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

