

24700
देवस्थान पदाधिकाऱ्यांचा सत्कार
मालवण, ता. १४ : पिंगुळी कुडाळ येथील निवासी सद्गुरू राऊळ महाराज यांचे जीवनकार्य भाविकांसाठी मोठे प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचे कार्य संत महात्म्यांच्याच दर्जाचे आहे, असे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या कोकण दौऱ्यादरम्यान श्री. इंगळे, प्रथमेश इंगळे आणि त्यांच्या मित्र परिवाराने पिंगुळी येथील सद्गुरू राऊळ महाराज मंदिराला भेट देऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राऊळ महाराज देवस्थानच्या वतीने विश्वस्त विनायक पणशीकर यांनी महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे आणि विश्वस्त महेश गोगी यांचा राऊळ महाराजांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीनेही राऊळ महाराज मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन चेअरमन महेश इंगळे यांनी केला. यावेळी हडपीड श्री स्वामी समर्थ मठाचे सचिव नंदकुमार पेडणेकर, अध्यक्ष प्रभाकर राणे, कोकण कट्टयाचे कुमार पितळे उपस्थित होते.