स्पर्धा परीक्षांमुळे करिअरला दिशा
24701
स्पर्धा परीक्षांमुळे करिअरला दिशा
संजय कातिवले ः फणसगाव महाविद्यालयात ‘सप्तरंग २०२६’
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासूनच करून या आव्हानात्मक परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे प्रतिपादन विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी संजय कातिवले यांनी केले. कला व वाणिज्य महाविद्यालय, फणसगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई संचलित आणि मुंबई विद्यापीठ संलग्न फणसगाव महाविद्यालयात स्नेहसंमेलन सोहळा ‘सप्तरंग २०२६’ दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. कातिवले यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक तथा माजी अध्यक्ष सहदेव नारकर, संस्थेचे अध्यक्ष अनुरुद्र नारकर आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात सहदेव नारकर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात कलेचे असलेले स्थान आणि महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे प्रमुख कार्यवाह संदेश नारकर यांनी महाविद्यालयाच्या भविष्यातील वाटचालीची माहिती देताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराप्रमाणेच आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विविध नवीन कोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे, असे सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल तथा नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नारकर, समृद्धी चव्हाण पंचायत समिती सदस्य, देवगड यांचा संस्था व महाविद्यालयाच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
‘आदर्श विद्यार्थिनी’ रिया अनभवणे आणि ‘आदर्श विद्यार्थी’ कृष्णकांत गुरव यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी खजिनदार अविनाश नारकर, विश्वस्त अनंत गुरव, माजी अध्यक्ष अशोक शांताराम नारकर, कार्यकारिणी सदस्य संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य अनुश्री नारकर यांनी प्रास्ताविक, प्रा. ज्योत्स्ना कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनायक जमदाडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

