फोंडाघाट कृषी महाविद्यालयात
विद्यार्थ्यांना कुक्कुटपालनाचे धडे

फोंडाघाट कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कुक्कुटपालनाचे धडे

Published on

24702

फोंडाघाट कृषी महाविद्यालयात
विद्यार्थ्यांना कुक्कुटपालनाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी ‘अनुभवातून शिक्षण कार्यक्रम’ उपक्रमांतर्गत महाविद्यालयात कुक्कुटपालनाचे शिक्षण घेत आहेत.
या उपक्रमात कुक्कुटपालन व्यवसायाशी निगडित पक्ष्यांच्या निवारा शेडची उभारणी कशी करावी, अंडी देणाऱ्या आणि मांसल पक्ष्यांच्या विविध जाती आणि त्यांचा अभ्यास, तसेच त्यांची निवड कशी करावी, निवारा शेडची स्वच्छता व निर्जंतुकीकरण कसे करावे, पक्ष्यांचे विविध आजार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, पिल्लांचे लसीकरण, खाद्य व पाणी व्यवस्थापन कसे करायचे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरगुती पद्धतीने खाद्य कसे तयार करावे, याबाबत विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागप्रमुख सहाय्यक प्राध्यापक सुशीलकुमार मोटे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या उपक्रमासाठी ब्राह्मणेश्वर शैक्षणिक व सामाजिक उन्नती मंडळ, फोंडाघाटचे अध्यक्ष दीपेश मराठे, मिताली मराठे, सचिव विद्या राणे पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com