देवरुख आगारातून मुंबई, पुण्याला जादा गाड्या
देवरुख आगारातून
मुंबई, पुण्याला जादा गाड्या
होळीनिमित्त नियोजन ; परतीचा प्रवास होणार सुखकर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः शिमगा अर्थात होळीचा सण मार्चच्या पहिल्या आठवड्यात साजरा होणार आहे. यानिमित्ताने मुंबई, पुणे येथे उद्योग-नोकरी निमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासियांची कोकणात येण्यासाठी मोठी गर्दी होईल. याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळ देवरुख आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
येत्या २६ फेब्रुवारी पासून जादा गाड्या धावणार असून या व्यतिरिक्त आपल्या गावातून मुंबईला जाण्यासाठी जादा गाडी ग्रुप बुकिंगच्या माध्यमातूनही आरक्षित करता येणार आहे. त्यासाठी देवरुख आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. जादा गाड्या आणि त्यांची वेळ पुढीलप्रमाणे ः सकाळी ७ वा देवरुख-मुंबई, सायंकाळी ७.३० वा मुंबई-करजुवे, सकाळी ५.३० वा. देवरुख-बोरिवली, सायंकाळी ७.३० बोरिवली-ओझरे स्कुल, दुपारी १ वा. देवरुख-स्वारगेट, रात्री १०.३० वा स्वारगेट-देवरुख, सकाळी ७.३० वा. देवरुख-विठ्ठलवाडी, रात्री ८ वा. विठ्ठलवाडी-देवरुख, सकाळी ६ वा देवरुख-बोरिवली, रात्री ८.१५ वा. बोरिवली-तांबेडी संगमेश्वर. यापैकी देवरुख-विठ्ठलवाडी-देवरुख ही बस ११ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली असून उर्वरित सेवा २६ पासून उपलब्ध असतील. तसेच देवरुख-कल्याण, विठ्ठलवाडी-देवरुख ही बस प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास कायम सुरु ठेवण्याचाही प्रयत्न केला जाईल, अशी माहिती देवरुख आगार व्यवस्थापक श्रीमती मधाळे यांनी दिली.

