पिंगुळी राऊळवाडी रेल्वे 
ट्रॅकवर अनोळखी मृतदेह

पिंगुळी राऊळवाडी रेल्वे ट्रॅकवर अनोळखी मृतदेह

Published on

पिंगुळी राऊळवाडी रेल्वे
ट्रॅकवर अनोळखी मृतदेह
कुडाळ ः पिंगुळी राऊळवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी (ता. १४) दुपारी चारच्या सुमारास समोर आली. हा अपघात, की आत्महत्या, याबाबत कुडाळ पोलिस तपास करीत आहेत. मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने ओळख पटवण्यात अडचण येत आहेत. मृताचे वय अंदाजे ५२ ते ५५ वर्षे असून त्याच्या अंगात पिस्ता रंगाचा हाफ टी-शर्ट, पांढऱ्या रंगाची हाफपॅंट आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
---
चिंदर येथे शुक्रवारी
नेत्र चिकित्सा शिबिर
आचरा ः शिवजयंतीनिमित्त चिंदर येथील ठाकरे शिवसेना शाखेतर्फे शुक्रवारी (ता. २०) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे चिंदर गावठणवाडी सातेरी मंदिर नजीक मिलिंद चिंदरकर यांच्या निवासस्थानी आयोजन केले आहे. शिबिरात तज्ज्ञांकडून नेत्र चिकित्सा करण्यात येणार आहे. तसेच माफक दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन ठाकरे शिवसेनेतर्फे आचरा विभागप्रमुख समीर लब्दे यांनी केले.
..................
कोळंब येथे २४ पासून
इंटरवाडा क्रिकेट स्पर्धा
मसुरे ः कोळंब येथील श्रीकृष्ण क्रिकेट मंडळातर्फे २४ ते २८ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत खुली इंटरवाडी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या संघाला २५ हजार व चषक, उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. इच्छुक संघांनी २१ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संदीप शेलटकर, महेश शेलटकर, यश कोयंडे, कीर्तेश परब यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
.......................
इळये आरोग्य केंद्राच्या
प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन
देवगड ः इळये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन प्रवेशद्वाराचे उद्‍घाटन सरपंच रवींद्र ठुकरुल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी उपसरपंच गुरुनाथ राणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेहुल जाधव, ग्रामपंचायत सदस्य भाऊ कदम, ग्रामपंचायत अधिकार उज्वल झरकर आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रवेशद्वाराची उभारणी इळये गावचे रमाकांत कदम यांनी त्यांच्या मातोश्री सत्यभामा अर्जुन कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com