होळीनिमित्त 
जादा गाड्या

होळीनिमित्त जादा गाड्या

Published on

होळीनिमित्त
जादा गाड्या
कणकवली ः शिमगा अर्थात होळीचा सण मार्चच्या पहिल्या आठवड्यात साजरा होणार आहे. यानिमित्ताने मुंबई, पुणे येथे उद्योग-नोकरी निमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासीयांची कोकणात येण्यासाठी मोठी गर्दी होईल. याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळ देवरुख आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. येत्या २६ फेब्रुवारी पासून जादा गाड्या धावणार असून या व्यतिरिक्त आपल्या गावातून मुंबईला जाण्यासाठी जादा गाडी ग्रुप बुकिंगच्या माध्यमातूनही आरक्षित करता येणार आहे. त्यासाठी देवरुख आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. जादा गाड्या आणि त्यांची वेळ पुढीलप्रमाणे ः सकाळी ७ वा देवरुख-मुंबई, सायंकाळी ७.३० वा मुंबई-करजुवे, सकाळी ५.३० वा. देवरुख-बोरिवली, सायंकाळी ७.३० बोरिवली-ओझरे स्कुल, दुपारी १ वा. देवरुख-स्वारगेट, रात्री १०.३० वा स्वारगेट-देवरुख, सकाळी ७.३० वा. देवरुख-विठ्ठलवाडी, रात्री ८ वा. विठ्ठलवाडी-देवरुख, सकाळी ६ वा देवरुख-बोरिवली, रात्री ८.१५ वा. बोरिवली-तांबेडी संगमेश्वर. यापैकी देवरुख-विठ्ठलवाडी-देवरुख ही बस ११ फेब्रुवारीपासून सुरु केली आहे.
----
पुरातन मंदिरांमध्ये
शिवशंभोचा गजर
सावंतवाडी : संगमेश्वर तालुक्यातील पुरातन व चालुक्य राजवटीतील शिवमंदिरांमध्ये रविवारी महाशिवरात्रीनिमित्त ''शिवशंभो''चा जयघोष घुमला. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कळंबस्ते साटलेवाडी येथील श्री रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासूनच विधीवत अभिषेक आणि आरती संपन्न झाली. साटलेवाडी समाजसेवा आणि मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने या निमित्ताने सामाजिक उपक्रमावर भर देण्यात आला होता. डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या सहकार्याने परिसरातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य सुविधेचा लाभ अनेक ग्रामस्थांनी घेतला. तसेच कसबा येथील ऐतिहासिक व चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर मंदिरातही महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com