जांभेकर विद्यालयात बालविवाह मुक्त भारत शपथ
- rat१६p१.jpg-
२६O२४९०९
रत्नागिरी : गोदूताई जांभेकर विद्यालयात भाकर संस्थेच्या वतीने बालविवाह मुक्त भारत शपथ देताना निकिता कांबळे. सोबत संजना तारी, शीतल धनावडे आदी.
---
बालविवाह मुक्तीचा निर्धार
जांभेकर विद्यालयात, विद्यार्थ्यांना शपथ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात भाकर (लांजा) संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना बालविवाह मुक्त भारत शपथ देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संजना तारी आणि प्रमुख वक्त्या म्हणून भाकर संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक शीतल धनावडे व सामाजिक कार्यकर्त्या निकिता कांबळे उपस्थित होत्या.
प्रकल्प व्यवस्थापक शीतल धनावडे यांनी भाकर संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या आजी– आजोबांचे गाव (वृद्धाश्रम) या उपक्रमांतर्गत सध्या १९ गरजू वृद्धांचा समावेश आहे. ज्यांना नातेवाईक नसतात किंवा ज्यांची काळजी घेणारे कोणीही नसते, अशा वृद्धांसाठी सुरक्षित निवासाची व्यवस्था केली आहे. याशिवाय महिला समुपदेशन केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र, लांजा येथे राहण्याची सोय, शेततळे उभारणी, अंधनिधी देणगी संकलन असे विविध सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी शीतल धनावडे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. शाळेमध्ये शिक्षक व पालकांच्या परवानगीशिवाय फेविकॉल व व्हाइटनर यांसारख्या पदार्थांचा वापर करू नये, असे आवाहन केले. भाकर संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या निकिता कांबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालविवाह मुक्त भारत शपथ दिली. मुख्याध्यापिका संजना तारी यांनी समाजातील घातक प्रथा दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सजग व जबाबदार नागरिक म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले. समीक्षा लिंगायत यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

