राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत तन्वी पारकरला कास्यपदक
24904
राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत
तन्वी पारकरला कास्यपदक
कणकवली, ता. १६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, दिल्ली यांच्यावतीने त्यागराज स्टेडियम, दिल्ली येथे नुकत्याच राष्ट्रीय स्तरावरील शालेय ज्युदो स्पर्धा झाल्या. यात कणकवली कॉलेजची तन्वी संतोष पारकर (इयत्ता बारावी, विज्ञान शाखा) हिने उल्लेखनीय कामगिरी करत १९ वर्षांखालील मुलींच्या ३६ किलो वजनी गटात कास्यपदक (तृतीय क्रमांक) पटकावले.
तन्वीच्या या यशामुळे कणकवली कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय स्तरावर दमदार खेळ करत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. आपल्या यशाचे श्रेय तन्वीने आई-वडील, तसेच शिक्षकांना दिले असून क्रीडा शिक्षिका जे. बी. कसालकर यांनी तिला मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी, तसेच प्राचार्य युवराज महालिंगे यांनी तन्वीचे अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

