लेखन स्पर्धेत पल्‍लवी शिंदे माने प्रथम

लेखन स्पर्धेत पल्‍लवी शिंदे माने प्रथम

Published on

24905

लेखन स्पर्धेत पल्‍लवी शिंदे माने प्रथम

साद फाउंडेशनचा पुढाकार, मालिनी द्वितीय, तनया तृतीय

कणकवली, ता. १६ : साद फाउंडेशनतर्फे गुरु-शिष्य प्रेमपत्र लेखन स्पर्धा झाली. यात प्रथम क्रमांक पल्लवी शिंदे माने यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक मालिनी लाड तर तृतीय क्रमांक तनया पाटील यांनी पटकावला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते आशालता पडवेकर, सुगंधा देवरुखकर, गौरी बांदेकर, सीमा हडकर, सतीश कदम, मधुरा समेळ परब आणि श्रेयस शिंदे यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अजय कांडर आणि संध्या तांबे यांनी काम पाहिले.
‘साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’च्या वतीने खुल्या गुरु-शिष्य प्रेमपत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. गितांजली नाईक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी दिपाली मुंडये नाईक, गोरेश नाईक, साद फाउंडेशनचे संस्थापक लतिका नाईक, सचिन कोर्लेकर, आर्किटेक्ट शंकर सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी प्रशासकीय अधिकारी सुगंधा देवरुखकर, संगीत अभ्यासक माधव गावकर, प्रा. जगदीश राणे, स्नेहलता राणे, श्री. वनवे, राजेंद्र कदम आदी उपस्थित होते.
संध्या तांबे म्हणाल्या, ‘‘या स्पर्धेमुळे अनेक जण लेखनासाठी प्रेरित झाले ही बाब महत्‍वाची आहे. ८५ वर्षांच्या आजींपासून ते दहा-बारा वर्षांच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बहुसंख्य पत्रे दर्जेदार असल्याने परीक्षण करताना मोठी कसरत करावी लागली.’’
कवी कांडर म्हणाले, ‘‘तब्बल ७१ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून लेखक सहभागी झाले, यावरूनच या उपक्रमाचे मोल अधोरेखित होते. गितांजली नाईक सावंत यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. दर्शना पाताडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अपूर्वा गोलतकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com