आंगणे कुटुंबियांतर्फे मान्यवरांचे सत्कार

आंगणे कुटुंबियांतर्फे मान्यवरांचे सत्कार
Published on

swt169.jpg
24924
आंगणेवाडी ः येथे आंगणे कुटुंबियांतर्फे मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

आंगणे कुटुंबियांतर्फे
मान्यवरांचे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. १६ ः आंगणे कुटुंबीयांचे आंगणेवाडी यात्रोत्सवातील नियोजन कौतुकास्पद आहे. आंगणेवाडीच्या पुण्यभूमीतील हा सत्कार जगतजननी आई भराडी मातेचा प्रसादच आहे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले. आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. आंगणेवाडी नाट्य मंडळ मुंबई, आंगणे कुटुंबिय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने आंगणेवाडी येथे यात्रा उत्सवात चांगले काम करणाऱ्या तसेच विशेष योगदान प्राप्त मान्यवरांचा सत्कार सोहळा मंडळाचे अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी आंगणे कुटुंबांच्या वतीने ज्येष्ठ नाटककार नरेंद्र आंगणे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सांडव, युवा कार्यकर्ते देवेंद्र उर्फ आबा आंगणे, दत्तप्रसाद पेडणेकर, डॉ. विश्वास साठे, डॉ. पटवेकर यांचाही गौरव करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, उपाध्यक्ष आनन आंगणे, सेक्रेटरी काका आंगणे, बाळा आंगणे, मधुकर आंगणे, प्रसाद आंगणे, गजानन आंगणे, समीर आंगणे, नंदू आंगणे, संकेत आंगणे, महेश पटेल, सचिन आंगणे, जयवंत आंगणे, तनुराज आंगणे, दिनेश आंगणे, बाबू आंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com