शिवजयंतीनिमित्त दापोलीत कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त दापोलीत कार्यक्रम

Published on

शिवजयंतीनिमित्त
दापोलीत कार्यक्रम
दापोली ः दापोली येथील शिवाजीनगर येथे शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने १९ रोजी शिवतीर्थावर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. उत्सवाच्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांकडून लाठी–काठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून, त्यानंतर निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण होईल. या वेळी सातारा येथील प्रा. निरंजन फरांदे यांचे छत्रपती शिवाजी महाराज एक युगप्रवर्तक राजा या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे. या उत्सवात जागतिक वारसा स्थळ असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ला याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या उत्सवाला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र कदम आणि उदय आंब्रे यांनी केले आहे.

संत सेवालाल
महाराज जयंती साजरी
दापोली ः संत सेवालाल महाराज जयंती निमित्त दापोलीमधील सर्व बंजारा समाजातील मंडळींच्यावतीने रविवारी (ता. १५) मिरवणूक काढली. पारंपारिक पद्धतीची वस्त्रे परिधान करून अनेक महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. दापोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जालगांव पांगारवाडी अशी ही मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मूर्ती अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर संत सेवालाल महाराज उत्सव कमिटीतर्फे उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. भाविकांना संत सेवालाल उत्सव कमिटीमार्फत महाप्रसाद देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com