१३ ग्रामपंचायतीमधील २४ जागांवर पोटनिवडणूक

१३ ग्रामपंचायतीमधील २४ जागांवर पोटनिवडणूक
Published on

लांज्या तालुक्यात २४ जागा रिक्त
ग्रामपंचायत पोटनिवडणूक ; मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १६ : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या थेट सरपंच जागेसह २३ ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण २४ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबवण्यात येणाऱ्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या लांजा तालुक्यात एकूण १३ ग्रामपंचायतीमधील २४ रिक्त पदे आहेत. यामध्ये एका थेट सरपंच पदासह उर्वरित २३ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. यामध्ये भडे ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे.‌ याच ग्रामपंचायतीमधील ४ सदस्य पदे रिक्त आहेत. तर कुरचुंब ग्रामपंचायत २ पदे, वाघ्रट ग्रामपंचायत १, वेरळ ग्रामपंचायत १, बेनी बुद्रुक ग्रामपंचायत १, शिरवली ग्रामपंचायत ५, आगवे ग्रामपंचायत १, खावडी १, कोचरी २, कोट ग्रामपंचायत १, पुनस ग्रामपंचायत १, कोर्ले ग्रामपंचायत २ आणि वेरवली खुर्द ग्रामपंचायत १ अशी पदे रिक्त आहेत. या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर केली असून त्यावर २० फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करावयाच्या आहेत. २४ रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com