कातकरी आजही व्यवस्थेचा बळी....लोगो

कातकरी आजही व्यवस्थेचा बळी....लोगो

Published on

24965

कातकरी आजही व्यवस्थेचा बळी....लोगो (मालिका भाग १)

इंट्रो

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजातील बालविवाह रोखणे हे वेगळे काम म्हणून करता येणार नाही. त्याचा संबंध आदिवासी जीवनाशी त्यांच्या होणाऱ्या परवडीशी निगडीत आहे. त्यांच्या जगण्याचा स्तर उंचावण्यातील तो एक भाग आहे.या लोकांत होणारे बालविवाह हा शोषणाचाचभाग नसतो.ते थांबवणे आवश्यक आहेतच मात्र त्यांच्यावर गुन्हेगार असा शिक्का मारून ते साध्य होणार नाही. त्यासाठी काही वेगळी पावले उचलावी लागतील.
- शिरीष दामले, रत्नागिरी

-----------

कातकरी समाज अमृतकाळातही मागासलेला
बालविवाहाचे मूळ यातच ; डाटा बनवणे आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या एकूण लोकसंख्येचा डाटा तयार करणे आवश्यक आहे. त्यांचे आवश्यक असे आधार ,जन्माचा दाखला, रेशनकार्ड आदी दस्त आहेत का ? नसतील तर का नाहीत याचा शोध घेणे सरकारी यंत्रणेसाठी फार कठीण नाही. याबाबत या समाजाचे नेते चंद्रकांत जाधव यांनी सांगितले की आमच्या समाजाचे प्रश्न एकमेकात गुंतलेले आहेत.साऱ्याचे मूळ आहे ते त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक,सामाजिक मागासलेपणात.
आदिवासी लोक व्यवस्थेचे बळी आणि बालविवाहासारख्या प्रकरणानंतर त्यांना गुन्हेगार ठरवून पोलीस आणि इतर यंत्रणा त्यांना यंत्रणेचे बळी बनवत आहेत असे चित्र जाणवते. या लोकांच्या जगण्याचा स्तर उंचावणे त्यांना शासकीय तसेच शासनबाह्य आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने सर्वती मदत देणे, त्यांचे पुनर्वसन करणे याच्याऐवजी त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला जातो. तो एकदा सुरू झाला, त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का बसला (यात अल्पवयीन मुलेही आली) की मग ते यंत्रणेचे बळी ठरण्यास सुरुवात होते. हे बदलायचे असेल तर आदिवासींशी संबंधित सर्व सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था यांनी समन्वयाने सहृदयतेने, संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे. जेथे गुन्हेगारी अथवा शोषण असेल तेथे कायद्याचा बडगा हवाच मात्र अज्ञान, शिक्षणाचा अभाव, रुढीपरंपरा याच्या परिणामी जे घडते त्यात गुन्हेगारी कृत्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवून सुधारणा होणार नाही.

चौकट
व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न
या समाजातील बालविवाहांना बोल लावणे अथवा त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का लावणे सोपे आहे परंतु त्यांची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे बालकांचे अथवा पौगंडावस्थेत आलेल्या मुलांचे आई-वडील कामानिमित्त बाहेर असतात किंवा स्थलांतरित असतात कमी वयामध्ये मुला मुलींमध्ये संपर्क येतो आणि संबंधही येतो यातून बालविवाह होतात याचा परिणाम कुटुंबावर आणि या समाजावर होत आहे. काही वेळा बालविवाह सारख्या गोष्टी नकळत होतात आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होतात. ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु त्याला सरकारकडून आणि या समाजाकडूनही प्रतिसाद कमी मिळतो, अशी खंत चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली .

Marathi News Esakal
www.esakal.com