पंडित दीनदयाल उपाध्याय 
रोजगार मेळावा शनिवारी

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा शनिवारी

Published on

पंडित दीनदयाल उपाध्याय
रोजगार मेळावा शनिवारी
रत्नागिरी ः जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 21 रोजी रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, एमआयडीसी पोस्ट येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र.सहाय्यक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना, उद्योजकांना आपणांकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावीत अशा सूचना दिल्याचे दुधाळ यांनी सांगितले. प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करुन त्यांना कंपन्या किंवा उद्योजकांनी रोजगार उपलब्ध करुन द्यावा. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया या कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

-------

‘हिंद-दी-चादर’ निमित्त
जिल्ह्यात व्यापक जनजागृती

रत्नागिरी ः ‘हिंद-दी-चादर’ गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित विशेष समागमाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोकण विभागातील २,९९८ ग्रामपंचायतींपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनीही या उपक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवला असून, गावपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या मार्गदर्शनाखाली १० फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत ही मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या समन्वयातून ''हिंद-दी-चादर'' समागमाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समागमाच्या निमित्ताने गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज सकाळी विशेष स्वच्छता मोहिमा राबवल्या जात आहेत. यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
हा उपक्रम केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नसून, त्याद्वारे स्वच्छता आणि सामाजिक एकोप्याचा संदेश जनमानसात रुजविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

-----

अनारी दत्त मंदिराचा
आज प्रथम वर्धापन दिन

चिपळूण : येथील अनारी गावामधील दत्त मंदिराचा मंगळवारी (ता. १७) प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. गतवर्षी या मंदिराचे भव्य निर्माण कार्य पूर्ण करण्यात आले होते. दत्त मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सकाळच्या सत्रात श्रींचा अभिषेक, होम हवन, दिंडी प्रदक्षिणा, श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारच्या सत्रात महाप्रसाद, रात्री. ह.भ.प. मनोज महाराज पवार (अनारी) यांचे कीर्तन. तसेच वेहेळे भजन मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भजनानंतर श्री राम नाट्य नमन मंडळ (कामथे - हुमणे वाडी) यांचा नमनाचा कार्यक्रम आहे. दत्त मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्ते विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी दत्त मंदिराच्या या पहिल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वरदान वाडी तरुण विकास मंडळ आणि वरदान वाडी महिला मंडळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com