नारिंग्रे अपहार प्रकरणातील
संशयितांवर कारवाई करा

नारिंग्रे अपहार प्रकरणातील संशयितांवर कारवाई करा

Published on

24959

‘नारिंग्रे अपहार प्रकरणातील
संशयितांवर कारवाई करा’

निमेश राणेंचे सिंधुदुर्नगरीत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः नारिंग्रे ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अपहार झाल्याचे उघड होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील निमेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले.
नारिंग्रे येथील निमेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नारिंग्रे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याचे डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेत उघड झाले. यावेळी जोपर्यंत भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत कोणीही घरपट्टी भरणार नाही, अशा प्रकारचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते घेतला होता. तसेच गटविकास अधिकारी देवगड यांच्याकडे ग्रामस्थांनी याबाबतची सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केला. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार ४ मार्च २०२५ ला देवगड गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासनास चौकशी अहवाल दिला; मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून अद्याप झाली नाही. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही वारंवार लक्ष वेधूनही या प्रकरणात अद्यापही सखोल चौकशी झाली नाही. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक चौकशीबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कथित अपहारातील संशयित व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com