सह्याद्रीच्या कुशीत हर हर महादेव चा जयघोष

सह्याद्रीच्या कुशीत हर हर महादेव चा जयघोष

Published on

-rat१६p४.jpg -
२६O२४८८७
नागेश्वर : अत्यंत अवघड अशा नागेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त झालेली भक्‍तांची गर्दी.
----
नागेश्वराच्या दर्शनासाठी जनसागर
महाशिवरात्रीनिमित्त सह्याद्रीतील देवस्थानात भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः वासोटा किल्ल्याच्या उत्तरेला सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेल्या दुर्गम नागेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी रविवारी (ता. १५) महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा जनसागर उसळला होता. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या स्वयंभू तीर्थक्षेत्रावर दोन्ही जिल्ह्यांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली.
खेड तालुक्यातील चोरवणे गावाजवळ डोंगराळ भागात हे देवस्थान आहे. चिपळूण आणि खेड परिसरातील भाविकांनी डोंगरकपारीतून पायी प्रवास करत नागेश्वराचे दर्शन घेतले. दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातील बामणोली, शेंबडी आणि मुनावळे येथून शेकडो भाविकांनी बोटींच्या सहाय्याने कोयना नदीवरील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातून प्रवास करत डोंगर पायथा गाठला.
नागेश्वर हे प्राचीन शिवलिंग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर (गाभा) क्षेत्रात एका उंच सुळक्यावर वसले आहे. हे क्षेत्र अत्यंत दुर्गम असल्याने आणि व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असल्याने, बामणोली व कांदाटी वन कार्यालयामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किल्ले वासोटा पायथा आणि मेट इंदवली या मार्गावरून जाणाऱ्या शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विशेष गस्त घातली होती.
----
जलाशयातून दीड तासाचा प्रवास
नागेश्वरला जाण्यासाठी भाविकांना कोयना शिवसागर जलाशयातून सुमारे दीड तासाचा बोटीचा प्रवास करावा लागतो. यासाठी बामणोली, शेंबडी आणि मुनावळे येथून विशेष सोय करण्यात आली होती. वन्यजीव बामणोली कार्यालयाकडून भाविकांना यात्रेसाठी विनाशुल्क परवानगी देण्यात आली होती. रविवारी सुटीच्या दिवशीच महाशिवरात्र आल्याने यंदा गर्दीचा ओघ मोठा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com