सातार्डा स्कूलच्या विकासासाठी बांधील
24970
सातार्डा ः येथील महात्मा गांधी प्री-प्रायमरी स्कूलच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना सुदन कवठणकर, उदय पारिपत्ये, प्रतीक्षा मांजरेकर व इतर.
सातार्डा स्कूलच्या विकासासाठी बांधील
सुदन कवठणकर ः स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १६ ः सातार्डा महात्मा गांधी प्री-प्रायमरी स्कूलची प्रगती समाधानकारक आहे. शाळेसाठी लागणारे सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी प्रशालेच्या स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विकासक नीलेश ठाकूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, सातार्डे मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष अनिल तळवणेकर, महात्मा गांधी प्री-प्रायमरी स्कूल कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद आसोलकर, स्कूल व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष राजन हळदणकर, माजी अध्यक्ष बाळू बर्डे, विकासक भोजनाथ गावडे, महात्मा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका संज्योती पेडणेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. पारिपत्ये, श्री. बर्डे, नीलेश ठाकूर यांनी मनोगते व्यक्त केली.
सुदन कवठणकर यांना नीलेश ठाकूर व उदय पारिपत्ये यांना ॲड. आसोलकर यांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केले. विविध परीक्षा, खेळांमध्ये यश प्राप्त केलेल्या मुलांना प्रशस्ती पत्रक, भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविले. मुलांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुळशीदास मयेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश गोवेकर, संदीप पेडणेकर, नीता परब, संज्ञा नाईक, ममता नागवेकर, कला कवठणकर, शेफाली राऊळ, सौ. पारिपत्ये यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित रसिक प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा केली. शिक्षिका शेफाली राऊळ यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका संज्योती पेडणेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

