बांद्यात ७ मार्चपासून 
''स्वयंसिद्धा मी'' महोत्सव

बांद्यात ७ मार्चपासून ''स्वयंसिद्धा मी'' महोत्सव

Published on

बांद्यात सात मार्चपासून
‘स्वयंसिद्धा मी’ महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः जागतिक महिला दिनानिमित्त क्रिएटिव्ह सखी ग्रुप, बांदा यांच्या वतीने ‘स्वयंसिद्धा मी’ हा आत्मनिर्भर स्त्रीशक्तीचा उत्सव आयोजित केला आहे. विठ्ठल मंदिर हॉल, गांधी चौक येथे ७ व ८ मार्चला हा दोन दिवसांचा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खाद्य जत्रा भरवण्यात येणार असून, सौंदर्य प्रसाधने, वस्त्र प्रावरणे तसेच गृहोपयोगी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.
या महोत्सवासाठी फूड स्टॉल व वस्तू विक्री स्टॉलचे बुकिंग सुरू झाले आहे. इच्छुक महिलांनी संपर्क साधून स्टॉल बुकिंग करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्टॉल बुकिंगची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी असल्याचे कळवले आहे. महोत्सवात विशेष आकर्षण म्हणून ७ मार्चला सायंकाळी ६ वाजता ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तसेच ८ मार्चला महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत महिलांनी भारतीय संस्कृती दर्शवणारी कोणतीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी व्हायचे आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम २५०० रुपये, द्वितीय २००० रुपये व तृतीय बक्षीस १५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये महिला बचतगट, उद्योजिका व स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com