सावंतवाडी नरेंद्र डोंगर पक्षी वैभवाचे केंद्रच

सावंतवाडी नरेंद्र डोंगर पक्षी वैभवाचे केंद्रच

Published on

swt1621.jpg ते swt1627.jpg
24978, 24984, 24982, 24983, 24981, 24979, 24980
सावंतवाडी ः नरेंद्र डोंगर परिसरात विविध पक्ष्यांचे दर्शन.

सावंतवाडी नरेंद्र डोंगर पक्षी वैभवाचे केंद्रच
५२ प्रजातींची नोंद ः ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ मध्ये शिक्कामोर्तब
सकाळ वृत्तसेवा
​सावंतवाडी, ता. १६ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या जैवविविधतेच्या वारशामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पक्ष्यांचा मोठा वावर पाहायला मिळतो. सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर हे पक्षी वैभवाचे केंद्र असून, या ठिकाणी नुकत्याच झालेल्या ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’मध्ये ५२ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. ​
‘कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथोलॉजी’ आणि ‘नॅशनल ऑडुबोन सोसायटी’ यांच्यावतीने जागतिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येतो. या अंतर्गत ‘वाइल्ड कोकण सावंतवाडी’ संस्थेच्या वतीने नरेंद्र डोंगरावर पक्षी गणना करण्यात आली. या गणनेत हळद्या, कोतवाल, निळ्या डोक्याचा कस्तूर, हरियाल, श्यामा, हॉर्नबिल (धनेश) आणि ऑरेंज मिनीवेट यांसारख्या देखण्या पक्ष्यांचे दर्शन झाले.
​या उपक्रमात वाइल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर यांच्यासह डॉ. गणेश मर्गज, अभिमन्यू लोंढे, ज्ञानेश नाईक, अश्वेक गवस, कोमल कांबळी आणि डेसमॉंड लोबो हे पक्षीमित्र सहभागी झाले. नरेंद्र डोंगरावरील पक्ष्यांचा किलबिलाट पक्षीप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरत असून, या गणनेमुळे येथील जैवविविधतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com