

-rat१६p२०.jpg-
२६O२४९९२
संगमेश्वर ः आरवली येथील पुलावर रात्री दिव्यांची सोय केलेली नाही.
----
आरवलीतील उड्डाणपुलावर अंधार
पथदिव्यांचा अभाव; वाहनधारकांच्या जिवाला धोका
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १७ : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली येथील नवीन चार पदरी उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी भीषण अंधाराचे साम्राज्य असते. या पुलावर पथदिवे बसवलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत आरवली येथे प्रवाशांच्या सोयीसाठी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र, या पुलावर बसवण्यात आलेले हाय-मास्ट दिवे आणि पथदिवे बसवण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी पुलावर पूर्णपणे काळोख असतो, ज्यामुळे चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषतः वळणांवर आणि पुलाच्या सुरुवातीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे समोरचे काहीच दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
------
कोट
लाखो रुपये खर्चून पूल बांधला, मग दिव्यांची सोय का नाही? महामार्गावर सावर्डे, तुरळ, असुर्डे, धामणी या ठिकाणी पथदिवे बसवण्यात आले आहेत. मग महत्त्वाच्या आरवली येथील उड्डाणपुलावरच पथदिवे का बसवले जात नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांना आरवली गावाबद्दल वावडे आहे का?
---मंगेश परकर, सामाजिक कार्यकर्ते, आरवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.