तळकट देऊळवाडीत गवस यांचा सत्कार
24917
तळकट ः येथे गणेशप्रसाद गवस यांचा सत्कार करताना नीळकंठ सावंत, विष्णू घाडी, अजित सावंत आदी.
तळकट देऊळवाडीत
गवस यांचा सत्कार
कोलझर, ता. १६ ः तळकट येथे काल (ता. १५) नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गणेशप्रसाद गवस यांचा देऊळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तेथील माऊली मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हा कार्यक्रम झाला. कोलझर पंचायत समिती मतदारसंघातून श्री. गवस बिनविरोध निवडून गेले आहेत. यावेळी देऊळवाडी ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. ग्रामस्थ नीळकंठ सावंत, विष्णू घाडी, महादेव सावंत, अजित सावंत, गणपत शिरोडकर, गोविंद गवस, सीताराम सावंत, कृष्णा सावंत, विवेकानंद सावंत, श्री. वेटे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

