काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी

Published on

25018

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी

सावंत ः शिवरायांशी तुलनेमुळे संताप

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ : काँग्रेस पक्ष हा नेहमीच हिंदू द्वेष करत आला आहे. आपल्या वाक्यातून सांप्रदायिक द्वेष कसा पसरवता येईल, याकडे या पक्षाच्या नेत्यांचे नेहमीच लक्ष असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष पाहावे, अशी केलेली टिप्पणी हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे सकपाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘जाणता राजा’ असे संबोधले जाते, तर टिपू सुलतान हा क्रूरकर्मा आहे. शत्रुगटातील स्त्रीला आईची उपमा देणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि शत्रुगटातील स्त्रीवर अत्याचार करून त्यांना जनानखान्यात डांबून ठेवणारे सुलतान यांची तुलनाच होऊ शकत नाही. शौर्याची तुलना क्रौर्याशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपकडून निषेध करत आहे, असे पुढे बोलताना श्री. सावंत यांनी सांगितले. खरंतर महाविकास आघाडीकडून सध्या एकत्र आलेले इतर पक्ष आणि त्यांचे नेते यांनीही याबाबतीत आपली स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची तुलना टिपू सुलतानाशी करणे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मान्य आहे का? त्यांचे यावरचे मौन पाहता त्यांना ही भूमिका मान्य असल्याचे जाणवते, असा उपरोधिक टोलाही श्री. सावंत यांनी विरोधकांना लगावला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात श्री. सावंत यांनी, स्त्रियांना कैदी बनवू नये, ही शिवछत्रपतींची विचारसरणी आणि याउलट स्‍त्रियांना कैद करून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करणे, ही टिपूची विचारसरणी, याची तुलना कशी काय होऊ शकते? याबाबत काँग्रेससहित इतर पक्षांनी उत्तर द्यावे. टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्वरित माफी मागावी. महाराष्ट्र त्यांना कदापी माफ करणार नाही. सिंधुदुर्ग भाजप आणि सिंधुदुर्गवासीयांतर्फे हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com