हळवल-परबवाडीत आजपासून ‘कलारंग महोत्सव’ची धूम
हळवल-परबवाडीत उद्यापासून
‘कलारंग महोत्सव’ची धूम
कणकवली, ता. १७ : हळवल परबवाडी (ता.कणकवली) येथील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळातर्फे गुरुवारी (ता.१९) ते रविवारी (ता.२२) दरम्यान भव्य ‘कलारंग महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. यात दिवसा क्रिकेट सामने आणि रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून महोत्सवाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता होणार आहे. दिवसभरात गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धा होतील. तर रात्री क्रीडारंग महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी बुवा सुजित परब व बुवा अखिलेश फाळके यांच्यात डबलबारी भजनाचा रंगतदार सामना रंगणार आहे. शुक्रवारी (ता.२०) ते रविवार (ता.२२) दरम्यान ‘एक तालुका - एक संघ’ या धर्तीवर कै. प्रमोद परब स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ होणार असून रात्री ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. शनिवारी (ता.२१) रात्री खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, खानोली यांचा महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होईल. तर रविवारी (ता.२२) सायंकाळी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आणि पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

