योगेश कदम वाढदिवस पुरवणी लेख १

योगेश कदम वाढदिवस पुरवणी लेख १

Published on

१८ (योगेश कदम वाढदिवस पुरवणी लेख १)

डोकं- गृहराज्यमंत्री योगेश कदम वाढदिवस विशेष

- rat१७p१.jpg-
२६O२५०८२
रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण.
- rat१७p१०.jpg-
२६O२५१२७
एका चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची भेट घेताना योगेश कदम.
- rat१७p१३.jpg-
२६O२५१२९
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम.
---
सुसंस्कृत नेतृत्व...

शहरातील शिक्षण; पण ग्रामीण मनाची अचूक ओढ. करारी आणि मृदू स्वभावाचा एक अनोखा संगम म्हणजे आमचे योगेश कदम होय.
काही माणसे अशी असतात की, ज्यांच्या सहवासात आल्यानंतर एक प्रकारचा विश्वास मिळतो. नेतृत्व कसं असावे, तर ते योगेश कदम यांच्यासारखे! तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं हे एक उमदं व्यक्तिमत्त्व आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.

- रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण, उद्योजक
चिंचघर-दस्तुरी, ता. खेड
----
योगेश कदम यांच्याकडे पाहिल्यावर पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे त्यांचा सुस्वभावीपणा. उच्चशिक्षित असूनही त्यांच्यात कुठेही गर्व नाही. उलट, त्यांचा ‘हजरजबाबीपणा’ आणि कठीण प्रसंगातही टिकवून ठेवलेला ‘करारीपणा’ कार्यकर्त्यांना नेहमीच ऊर्जा देतो. समोरची व्यक्ती कोण आहे, तिची अडचण काय आहे, हे ते मोठ्या संयमाने समजून घेतात.

*कदम कुटुंब अन् जिव्हाळ्याचे नाते

माझे आणि योगेश कदम यांचे संबंध केवळ राजकीय किंवा सामाजिक नाहीत तर ते जुने कौटुंबिक ऋणानुबंध आहेत. कदम कुटुंबाशी असलेल्या माझ्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे योगेश कदम यांच्याशी असलेले हे बंध काळानुसार अधिक दृढ होत गेले. त्यांच्या घरातील संस्कार आणि आपुलकी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. योगेश कदम यांच्या या प्रवासातील सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे शहरात वाढलेला आणि शिकलेला हा तरुण ग्रामीण भागातील प्रश्नांशी इतका समरस कसा झाला, हे अनेकांसाठी आजही एक कोडं आहे; पण योगेश कदम यांनी आपल्या उत्तम संघटन कौशल्याने आणि प्रखर आत्मविश्वासाने ग्रामीण भागातील सामान्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

*सर्वसामान्यांचा आधारवड
आज राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात; पण लोकांशी नाळ जोडून ठेवणारा योगेश कदम यांच्यासारखा नेता दुर्मिळ असतो. पद, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वसामान्यांची कामे होणे आणि त्यांना न्याय मिळणे यालाच ते नेहमी प्राधान्य देत आले आहेत. शब्दांना कृतीची जोड देणारा, ध्येयवेडा आणि जनसामान्यांच्या काळजात घर करणारा आमचा नेता...म्हणजेच योगेश कदम. आपली ही वाटचाल अशीच यशस्वी होत राहो आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

-------
चौकट १
ऐतिहासिक वारसा जपण्यावर भर
दापोली मतदार संघाला ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे या श्रद्धेच्या मंदिराचा विकास करण्यासाठी योगेश कदम सातत्याने प्रयत्नशील आहेत. पर्यटकांना भुरळ घालणारे मुरूड, कर्वे, हर्णै, आंजर्ले, वेळाससारखे समुद्रकिनारे अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक करण्यासाठी त्यांनी विशेष योजना आखल्या आहेत. गडकिल्ले संवर्धनासाठी त्यांनी शासकीय पातळीवर मोठा पाठपुरावा केला असून, पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळवून देणे हा त्यांचा प्रमुख मानस आहे.
---
चौकट २
स्वप्न एका समृद्ध मतदार संघाचे
दापोली मतदार संघ जागतिक पर्यटन नकाशावर यावा यासाठी योगेश कदम यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेवर पकड बसवली आहे. केवळ भौतिक विकासच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपण्याचे कामही ते करत आहेत. आंबडवे विकास आराखडा असो किंवा किनाऱ्यांचे सुशोभीकरण, योगेश कदम यांच्या या प्रत्येक निर्णयात मतदार संघाच्या उज्ज्वल भविष्याची दृष्टी दिसून येते.
----
चौकट ३
आदर्श मतदार संघाचा संकल्प
दापोली मतदार संघाला एक ‘मॉडेल’ म्हणून उभे करण्याचा योगेश कदम यांचा संकल्प आहे. जनतेला मुबलक व स्वच्छ पाणी, दर्जेदार शिक्षण आणि अद्ययावत आरोग्यसुविधा तळागाळापर्यंत पोहोचवणे, हा त्यांचा ध्यास आहे. त्यांनी तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कौशल्य विकास केंद्रांवर भर दिला आहे. महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना बाजारपेठ मिळवून देणे, व्यायामशाळांचे जाळे विणणे आणि खेळाडूंसाठी सुसज्ज मैदाने तयार करणे, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
-----
चौकट ४
वारसा संघर्षाचा, आशीर्वाद ‘नेत्यांचा’
शिवसेना नेते आणि कोकणची बुलंद तोफ रामदास कदम यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली योगेश कदम यांची राजकीय कारकीर्द बहरत आहे. वडिलांचा आक्रमक बाणा आणि जनतेसाठी लढण्याची जिद्द योगेश कदम यांच्या रक्तातच आहे. हाच वारसा ते समर्थपणे पुढे नेत असून, शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवेचा यज्ञ त्यांनी सुरू ठेवला आहे. रामदास कदम यांनी ज्या निष्ठेने कोकणची सेवा केली त्याच वाटेवरून चालताना योगेश कदम यांनी आपल्या कल्पकतेची भर घातली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com