डेंटल कॉलेज ते खोंडा कॉर्नर रस्ता रुंदीकरणाची काँग्रेसची मागणी

डेंटल कॉलेज ते खोंडा कॉर्नर रस्ता रुंदीकरणाची काँग्रेसची मागणी

Published on

डेंटल कॉलेज–खोंडा कॉर्नर रस्ता रुंद करा
डॉ. विलास शेळके ः अवजड वाहनांना बंदी घाला
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १७ : खेड नगरपालिकेच्या हद्दीतील डेंटल कॉलेज ते खोंडा कॉर्नर हा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा पर्यायी रस्ता आहे; मात्र, या मार्गावरील वाढती रहदारी आणि अरुंद रस्ता यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी सदर रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास शेळके यांनी केली आहे.
खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना या संदर्भात डॉ. शेळके यांनी सविस्तर निवेदन दिले असून, त्यामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. डॉ. शेळके यांनी या निवेदनाच्या प्रती आमदार योगेश कदम, रत्नागिरी जिल्हाधिकारी, खेड प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, भूमी अभिलेख उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांनाही पाठवल्या आहेत. प्रशासनाने यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. या निवदेनात डेंटल कॉलेज ते खोंडा कॉर्नरदरम्यानचा रस्ता दुतर्फा किमान ४-४ फूट रुंद करण्यात यावा, दापोलीकडून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणि शहरातील स्थानिक नागरिकांसाठी हा मुख्य पर्यायी मार्ग असल्याने त्याचे मजबुतीकरण आवश्यक आहे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रस्ता अरुंद असल्याने या मार्गावर केवळ छोट्या वाहनांना परवानगी द्यावी व अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालावी, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
----
प्रत्यक्ष जागेची पाहणी करा
खेडमधील डेंटल कॉलेज ते खोंडा कॉर्नर या परिसरातील रस्त्याची प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे तरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करता येतील, असे शेळके यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com