राजापूरच्या पूर्व पट्ट्यातील अप्पर तहसीलचा प्रश्न अधांतरी

राजापूरच्या पूर्व पट्ट्यातील अप्पर तहसीलचा प्रश्न अधांतरी

Published on

- rat17p7.jpg-
26O25098
पाचल (राजापूर) ः धरणांमुळे पाचल परिसराची नवी ओळख तयार होत आहे.
----
‘अप्पर तहसील’चा प्रश्न अधांतरी
राजापूरच्या पूर्वपट्ट्यातील भाग; पाचल की रायपाटण वादात निर्णय प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ : राजापूर तालुक्याचा पूर्व विभाग, जो सह्याद्रीच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागात वसलेला आहे तिथे स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. या मागणीला पर्याय म्हणून अप्पर तहसील कार्यालय देण्याच्या हालचाली गेल्या वर्षी प्रशासकीय पातळीवर झाल्या होत्या; मात्र, वर्ष झाले तरी या कार्यालयाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी, दुर्गम भागातील जनतेची कार्यालयासाठीची प्रतीक्षा कायम आहे.
राजापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असून, या तालुक्यातील पाचल, रायपाटण आणि आसपासची गावे राजापूर शहरापासून सुमारे ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर आहेत. महसुली किंवा इतर शासकीय कामांसाठी या भागातील नागरिकांना पूर्ण दिवस खर्च करून शहरात यावे लागते. पावसाळ्यात आणि दुर्गम भागात दळणवळणाची साधने कमी असल्याने वृद्ध, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात. ही गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र तालुका किंवा किमान अप्पर तहसील कार्यालय व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे. पाचल-रायपाटण चढाओढ आणि प्रशासकीय अहवाल अप्पर तहसील कार्यालय नेमके कुठे व्हावे, यावरून पाचल आणि रायपाटण या दोन प्रमुख गावांमध्ये चढाओढ सुरू आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी गेल्या वर्षी प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी दोन्ही ठिकाणी बैठका घेऊन ग्रामस्थांची मते जाणून घेतली होती. दोन्ही गावांनी आपापली बाजू मांडली आणि सोयीसुविधांचा दावा केला.
प्रांताधिकाऱ्यांनी हा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवून आता वर्ष पूर्ण झाले, तरीही शासन स्तरावरून ‘अप्पर तहसिलाच्या ठिकाणाबाबत कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. प्रस्ताव धूळखात, राजकारण की तांत्रिक अडचण? प्रशासकीय अहवाल सादर होऊनही निर्णय का रखडला आहे, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. प्रस्तावित तालुक्यात राजापूरसह शेजारच्या लांजा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील काही गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यामुळे सीमावर्ती भागातील गावांसाठी हे कार्यालय वरदान ठरणार आहे; मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि गावागावांतील चढाओढ यामुळे हा प्रस्ताव पुन्हा एकदा लालफितीत अडकला आहे की काय? अशी भीती व्यक्त होत आहे.
----
संभाव्य तालुक्यातील समाविष्ट गावे
अ) राजापूर तालुक्यातील गावे ः ओझर, कोळवणखडी, पाचल, ठिकाणकोंड, सौंदळ, परटवली, ओशिवळे, बागवेवाडी, तुळसवडे, आडवली, जांभवली, मोरोशी, हातदे, ताम्हाणे, चव्हाणवाडी, मूर, करक, तळवडे, जवळेथर, केळवली, आजिवली, मठ, सावडाव, वाळवड, काजिर्डा, कोळंब, हातदे, पांगरीखुर्द, येरडव, तुळसवडे, ठिकाणकोंड, येळवण, सोलिवडे, जांभलवाडी, धामणपे, निखरेवाडी, परूळे, झर्ये, हरळ, पाचल-पेठवाडी.
ब) वैभववाडी तालुका- तिरवडे, नेर्ले, हेत, उपळे, मोरवडे
क) लांजा- व्हेळ, कुरंग, कोंडगे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com