कोळोशीत शिवप्रतिष्ठानतर्फे आजपासून शिवजन्मोत्सव
25161
कोळोशीत शिवप्रतिष्ठानतर्फे
आजपासून शिवजन्मोत्सव
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १७ ः प्रतिवर्षाप्रमाणे शिवप्रतिष्ठान कोळोशी यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आदर्श गाव कोळोशी, शिवप्रतिष्ठान कोळोशी, रणरागिणी कोळोशी आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात उद्या (ता. १८) होणार असून, सकाळी १० वाजता मशाल आणण्यासाठी पद्ममनाम गड मालवण येथे प्रस्थान, राजकोट येथून मशाल घेऊन पायी कोळोशीकडे रवाना होतील. रात्री ९ वाजता ढोल-ताशांच्या गजरात मशालीचे कोळोशी येथे आगमन व स्वागत होईल. गुरुवारी (ता. १९) सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कोळोशी येथील शिवप्रतिमेचे पूजन, महिला टाळपथक व महिला लेझीम पथक यांच्या वतीने सवाद्य मिरवणूक, गावढणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज पूजन, शिवआरती, दुपारी मान्यवरांचे स्वागत व सत्कार, ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, लहान मुलांसाठी विविध फनी गेम्स, सायंकाळी भजने, रात्री ९ वाजता लकी ड्रॉ सोडत, १० वाजता श्री पावणादेवी लोककला हरकुळ खुर्द यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग ‘क्रोधासूर वध’ सादर करण्यात येणार आहे. सर्व शिवसैनिक व ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आदर्श गाव कोळोशी, शिवप्रतिष्ठान कोळोशी, रणरागिणी यांच्यावतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

