

25197
परुळेबाजार ग्रामपंचायतीला
यावली पंचायत टीमची भेट
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १७ ः सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत यावली (ता. बार्शी) येथील ग्रामपंचायत टीमने नुकतेच परुळे बाजार ग्रामपंचायतीला भेट देत विविध उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी यावली ग्रामपंचायत सरपंच प्रल्हाद तुरे, उपसरपंच सचिन उकरडे, सदस्य नीलेश उबाळे, अमित सरवदे, जबार बागवान, काका सरवदे, अभिजित उकरडे, विष्णू उकरडे, हर्षद ढोरे, किरण वाघमारे (ग्रामपंचायत अधिकारी) यांचा समावेश होता. परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी यावली ग्रामपंचायत समितीने परुळे बाजार ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपक्रमाअंतर्गत केलेल्या कामांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे काथ्या प्रकल्प युनिट, सांडपाणी प्रक्रिया, वॉटर एटीएम आदीची पाहणी करत परुळे बाजार ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
...................
25198
विजयदुर्ग-तळेरे-वेळगिवे
राज्यमार्गाचे काम हाती
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग-तळेरे राज्यमार्ग ते वेळगिवे हसनाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन नवनिर्वाचित पोंभुर्ले जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्य समृध्दी चव्हाण, सरपंच राजेंद्र लाड, माजी शाखाप्रमुख व मलबार हिल समन्वयक विजय घरत, उपसरपंच सहदेव लाड, माजी सरपंच संतोष चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख (पडेल मंडल) महेश पडवळ, ग्रामपंचायत सदस्य नीलेश नार्वेकर, संतोष नार्वेकर, संतोष भांडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. हा रस्ता पालकमंत्री नीतेश राणे यांच्या निधीतून मंजूर झाला असून यासाठी सरपंच लाड, घरत यांनी पाठपुरावा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.