विनामूल्य अर्ज भरण्याची 
‘बार्टी’कडून व्यवस्था

विनामूल्य अर्ज भरण्याची ‘बार्टी’कडून व्यवस्था

Published on

विनामूल्य अर्ज भरण्याची
‘बार्टी’कडून व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना न्याय मिळावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था ‘बार्टी’ सरसावली आहे. जिल्ह्यातील पालकांसाठी सर्व तालुक्यांमध्ये आरटीईचे अर्ज विनामूल्य भरून देण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
अर्ज करण्याची मुदत १७ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास, अनाथ, दिव्यांग, एचआयव्ही बाधित, तसेच कोविड प्रभावित बालके यांना प्रवेश घेता येणार आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पालकांना त्यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील शाळांची निवड संकेतस्थळावर करता येईल. ग्रामीण व दुर्गम भागातील पालकांना ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी) तर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियुक्त केलेले समतादूत पालकांना विनामूल्य फॉर्म भरून देण्यास सहकार्य करतील. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड आणि विभागीय प्रकल्प अधिकारी तेजस्विनी सोनवणे यांनी केले आहे. विनामूल्य अर्ज भरण्यासाठी पालकांनी मालवण-संग्राम कासले, देवगड-सुदीप कांबळे, सावंतवाडी-सगुण जाधव, वेंगुर्ले-सुजित जाधव, वैभववाडी-राजू दिनदयाळ, दोडामार्ग-सुहास मोचेमाडकर, प्रकल्प अधिकारी विजय कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com