

-rat१७p२१.jpg-
P२६O२५१५४
रत्नागिरी : जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत यश मिळवणारा सर्वंकष कनिष्ठ महाविद्यालयाचा यश भोंगले व सोबत राष्ट्रीय प्रशिक्षक सुधीर चैनूर.
--------
यश भोंगलेचे बॅडमिंटनमध्ये तिहेरी यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : जिल्हास्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सर्वंकष विद्यामंदिरमधील (एसव्हीएम स्कूल) यश भोंगले याने सलग दुसऱ्या वर्षी तिहेरी विजेतेपद पटकावले.
देवरूख येथे ही स्पर्धा झाली. त्यात सर्वंकष कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी यश भोंगले याने १९ वर्षांखालील आणि खुल्या पुरुष गटामध्ये विजेतेपद पटकवले तसेच पुरुष दुहेरीमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक सुधीर चैनूर यांच्याबरोबर खेळी करून विजेतेपद मिळवले. सलग दोन वर्ष उत्तम खेळी करून तिहेरी विजेतेपदाचा मानकरी बनला. यशला सर्वंकष विद्यामंदिर स्पोर्ट अॅकॅडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक सुधीर चैनूर प्रशिक्षण देत आहेत. स्कूलचे संस्थापक अर्जुन गद्रे यांनीही यशचे शाळेमार्फत अभिनंदन केले व रत्नागिरीसारख्या शहरामधून राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशने भाग घेऊन पुढे उत्तम कामगिरी करत असल्याबद्दल त्याचेही कौतुक केले. रत्नागिरी बॅडमिंटन असोसिएशन तसेच सर्वंकषच्या प्राचार्य मोनिका जैस्वाल यांनी यश व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.