-कोलधे-कुंभारवाडीत वाचनालय सुरू
कोलधे-कुंभारवाडीत वाचनालय सुरू
लांजा, ता. १८ ः तालुक्यातील कोलधे-कुंभारवाडीतील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून वाडीवस्तीत फिरून पुस्तक दिंडी काढून वाचाल तर वाचाल, पुस्तक हेच खरे मित्र अशा प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या. वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासाठी गावात वाचनालय सुरू करण्यात आले. दिवसभर गावात मनोरंजनात्मक विविध उपक्रम राबवण्यात आले. माजी विद्यार्थी कोलधे कुंभारगावच्यावतीने स्नेहमेळावा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात विशेष आकर्षण ठरलेल्या पुस्तकदिंडीने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच परशुराम घडशी, उपसरपंच महेंद्र कुंभार, ग्रामपंचायत सदस्य विशाल सुर्वे, कोलधे नं. १च्या मुख्याध्यापिका धनश्री बावधनकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सूरज घडशी, उपाध्यक्ष शुभम कुंभार, सचिव संदेश नारकर (बुवा) सहसचिव सौरव कुंभार, पोलिस पाटील सुहास घडशी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

