प्रभावी पालकत्व-बाल संगोपनाची योग्य दिशा

प्रभावी पालकत्व-बाल संगोपनाची योग्य दिशा

Published on

-rat१७p२०.jpg-
२६O२५१४५
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात पालकत्व कार्यक्रमात माधुरी कळंबटे यांचा सत्कार करताना विनायक हातखंबकर. सोबत धनश्री मुसळे, प्रतीक कळंबटे आणि दादा कदम.
----------
पाल्यास चांगल्या सवयी लावा
कळंबटे ः पालक प्रबोधन कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : स्वतःवर प्रेम करायला शिका. पहिली पाच वर्ष मुलांच्या जीवनाची पायाभरणी असते. या वयात शिकलेल्या चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टींचा त्यांच्या मनावर खोल परिणाम होत असतो. त्यामुळे चांगल्या सवयीचे सकारात्मक मार्गदर्शन दिल्यास मुलांचे भवितव्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, असे मार्गदर्शन नर्सरी उद्योजक प्रतीक कळंबटे व माधुरी कळंबटे यांनी केले.
बियाणी बालमंदिरमध्ये पालक प्रबोधन कार्यक्रमात त्यांनी प्रभावी पालकत्व या विषयावर दैनंदिन जीवनातली उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. मुलं हे आपलंच प्रतिरूप आहे. मुलांचं उत्तम संगोपन करणं, ही आई-वडिलांची सगळ्यात मोठी जबाबदारी असते. अपयशाचा सामना करण्याची, चुका स्वीकारण्याची सवय लावली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. बियाणी बालमंदिरतर्फे भारत शिक्षण मंडळाचे विश्वस्त आणि शाळा समिती प्रबंधक विनायक हातखंबकर तसेच शालेय समिती सदस्य दादा कदम यांनी श्री. व सौ. कळंबटे यांचा सत्कार केला. बालमंदिरचे पालक मलिनाथ कांबळे यांनी या कार्यक्रमाबद्दल आपल्या छान प्रतिक्रिया व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. मुख्याध्यापिका धनश्री मुसळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षिका आसावरी पावसकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com