नांदगाव बाजारपेठेत काजू विक्रीस

नांदगाव बाजारपेठेत काजू विक्रीस

Published on

25387

नांदगाव बाजारपेठेत काजू विक्रीस
नांदगाव ः नांदगाव परिसरात काजू बी तयार होण्यास सुरुवात झाली असून येथील आठवडा बाजारात खरेदीसाठी या हंगामात पहिला काजू दाखल झाला आहे. हंगामाची सुरुवात प्रतिकिलो १६० रुपये दराने सुरू झाली. परिसरात यावर्षी सुरुवातीला पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे काजू पीक भरघोस येईल अशी अपेक्षा असतानाच काही दिवसांपासून सततच्या पडलेल्या दाट धुक्यामुळे मोहोर जळून गेला. बियांवर काजळी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काजू बागायतदारांच्या आशेची निराशा झाली.
काजूला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळावा, या मागणीने जोर धरला होता; मात्र हंगामाची सुरुवात १६० रुपये दराने झालीआहे. लवकरच किफायतशीर दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
------

25395

कोळोशीत पारकर यांचा सत्कार
नांदगाव ः कासार्डे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांचा सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आलेले उमेदवार पारकर यांचा सिंधुपुत्र प्रतिष्ठान कोळोशी यांच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सिंधुपुत्र प्रतिष्ठानचे व्यवस्थापक उत्तम सावंत, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, प्रथमेश साळकर, अमित इंदप, हरेश सावंत, हर्ष सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com