धाडसी आणि अविचारी माणूसच नवनिर्मिती करू शकतो

धाडसी आणि अविचारी माणूसच नवनिर्मिती करू शकतो

Published on

rat१७p१५.jpg-
26O25125
सावर्डे: कृषिभूषण डॉ. तानाजी चोरगे यांची मुलाखत घेताना ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर.

धाडसी माणूसच नवनिर्मिती करू शकतो
डॉ. तानाजीराव चोरगे ः सहकार मराठी साहित्य संमेलनात मुलाखत
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १८ : विचारी मनुष्य व्यवसाय सुरू करताना अथवा काम करताना दहावेळा विचार करतो. व्यवसायात यश येईल की नाही, याबद्दल तो सांशक असतो. त्यामुळे तो व्यवसाय करण्यास धजावत नाही. याउलट धाडसी व अविचारी माणूस नवनिर्मितीचे काम करू शकतो. माझे बालपण हे धाडसी व रांगड्या कुटुंबामध्ये गेल्यामुळे मी आज इथपर्यंत मजल मारू शकलो, असे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले.
चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथे कृषिभूषण डॉ. तानाजी चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेतर्फे आयोजित ग्रामीण कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनातील मुलाखतवेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी चोरगे यांची मुलाखत घेतली. या प्रसंगी चोरगे म्हणाले, माझ्या सामाजिक व शैक्षणिक वाटचालीत माझे वडील लक्ष्मण चोरगे, माझे सासरे कै. गोविंदराव निकम व माझे गुरू बुधाजी मुळीक यांचा मोठा वाटा आहे. २००७ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर त्या वेळी बँकेचा व्यवसाय केवळ आठशे कोटी होता, आज तो साडेपाच हजार कोटीवर गेला आहे. बँकेने सभासदांना ३० टक्के लाभांश दिला आहे. बँक प्रगतिपथावर आणली; मात्र आम्ही खऱ्या अर्थाने कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांमध्ये सहकार म्हणावा असा वाढवू शकलो नाही, अशी खंत डॉ. चोरगे यांनी व्यक्त केली. वेळेचे योग्य नियोजन केले तर आपल्याला हवे ते करता येते. कफाच्या त्रासाने आजारी असताना झोप लागत नव्हती. या काळात माझ्याकडून दोन कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. वेळ मिळत नाही, असे म्हणणारे ढोंगी आहेत, असे त्यांनी सांगितले.
डॉ. चोरगे म्हणाले, प्रचलित जीवनपद्धतीत शेती व्यवसाय परवडत नाही. देशातील ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून होते. सध्या मात्र समाजात चैनीच्या गरजा खूप वाढल्या आहेत. या गरजा शेतीच्या उत्पन्नातून भागत नसल्यामुळेच लोकं शेती करणे सोडून देऊन शहराकडे धाव घेऊ लागले आहेत. या स्थलांतर विषयावरच ‘मी माझा गाव शोधतोय’ या विषयावर कादंबरी लिहीत आहे.
----
कोकणातील शेतकऱ्यांच्या गरजा मर्यादित
विदर्भ, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात. कोकणात मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याला कारण म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांच्या गरजा मर्यादित आहेत. कोविड काळात ज्या शेतकऱ्यांना कर्ज भागवणे शक्य झाले नाही, अशा शेतकऱ्यांचे साडेतीन कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माफ केले असल्याची माहिती चोरगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com